| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रामराज येथील मारोडे गावच्या रहिवाशी प्रफुल्ला रघूनाथ पाटील यांचे मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. प्रफुल्ला पाटील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने दोनवेळा ग्रामपंचायतीत निवडून आल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा पाटील परिवार आहे. प्रफुल्ला पाटील यांचे दहावे गुरूवारी (दि.7) पाली येथील श्री क्षेत्र उद्दर रामेश्वर येथे होणार आहेत. तर, तेरावे रविवारी (दि.10) मारोडे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.