न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे प्रल्हाद पाटील

। उरण । प्रतिनिधी ।

न्हावा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीतर्फे शेकापचे प्रल्हाद बाळाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

न्हावा ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 सदस्य असून त्यामध्ये शेकापक्ष 5, भाजप 3, शिवसेना 2 व काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे. उपसरपंच मंजुषा ठाकूर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि.12) निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी शेकापचे प्रल्हाद बाळाराम पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे उपसरपंचपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले.

उपसरपंचपदी प्रल्हाद पाटील यांची निवड जाहीर होताच सरपंच हरिश्‍चंद्र म्हात्रे, माजी सरपंच व पनवेल शेकापक्ष कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, माजी न्हावा गाव अध्यक्ष अशिष पाटील, माजी तंटामुक्त गाव अध्यक्ष प्रदीप ठाकूर, माजी उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी उपसरपंच किसन पाटील, माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर, माजी उपसरपंच साधना तांडेल, सदस्य निर्मला ठाकूर, अमृता पाटील, कल्पना घरत, विजया ठाकूर, देवेंद्र भोईर, न्हावाचे शेकापक्ष अध्यक्ष जयंत पाटील, सत्यवान पाटील, अमरनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी एन.आर. शेंडगे आदींनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version