| उरण | वार्ताहर |
दापोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पंकलेश डाऊर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदी निवड होताच शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, नंदराज मुगाजी, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य शेखर शेळके, सरपंच प्रशाली डाऊर, वंदना कटेकर, राजाभाई जितेकर, आकाश पाटील, प्रणाली पाटील, विकास पाटील, संघर्ष जितेकर, गोवर्धन डाऊर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.