पोलिसाच्या मुलांचा गुणगौरव

। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड़ पोलिस स्टेशन येथील स्टापच्या गुणवंत विद्यार्थी मुलांचा गुणगौरव सोहळा रोहे पोलीस डीवायएसपी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. नुकतेच दहावी,बारावी,विदयार्थ्यांचे निकाल लागले आहेत.यात पोलिसाच्या मुलांनी यश सांपदित केले असून कोलाड़ पोलीस स्टेशन हदीतील स्टाप यांच्या गुणवंत विद्यार्थी मुलांचा गुणगौरव सोहळा सपोनी सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोह्याचे प्रमोद बाबर,कोलाड़ सपोनी सुभाष जाधव नागोठणे नारनवर,पाली पोलिस काईंगडे साहेब उपस्थित होते. पोलिसांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान हा नक्कीच विद्यार्थ्यांचे आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी मोलाचे ठरेल.

Exit mobile version