। कोलाड । वार्ताहर ।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.8) राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे कोलाड पोलीस स्टेशन व वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
8 मार्च हा जगभरात महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच महिला दिनी खा.सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोहे तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे कोलाड येथे पोलीस स्टेशन मधील व वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोलाड पोलीस अधिकारी सुभाष जाधव, सुप्रिया जाधव, सोनाली वाचकवडे, सुरेखा पार्टे, समिक्षा घावटे, शितल बांगल, कोलाड सरपंच सागवेकर, उपसरपंच चिपळूणकर, सानवी बाईत, रोशनी बेर्डे, देशमुख, वारकर,,डॉ.मरवडे, डॉ.पडवळ व महिला पोलीस उपस्थित होत्या.