प्रकाश चौथाई यांचे निधन

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील नाट्यकलाकार, लेखक व शाहीर प्रकाश चौथाई यांचं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. रंगभूमीवर विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी पुरस्कारही प्राप्त केले होते. लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे शाहिरी कार्यक्रम ते खेड्यापाड्यातून सादर करत. आकाशवाणीसाठी त्यांनी संस्कृत नाटकं तसंच कौटुंबिक श्रुतिकांचं लेखनही केलं आहे.

Exit mobile version