प्रकाश थिटे यांचे निधन

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील प्रकाश महादेव थिटे यांचे गुरूवार, दि.24 मार्च रोजी वयाच्या सुमारे 53 व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. थिटे हे बांधकाम व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, बहिणी, चार मुले, पुतणे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शनिवार दि.2 एप्रिल रोजी तर अंतिम धार्मिकविधी मंगळ.दि.5 एप्रिल रोजी बाहे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version