प्रमोद गायकवाड यांना ‘भीमरत्न पुरस्कार’

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चरी येथील प्रमोद गायकवाड यांना ‘भीमरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. पुणे येथील एस.डी.ओव्हाळ ट्रस्ट व किमया आश्रम आयोजित हा सोहळा महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे पार पडला. हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सावित्रीबाई फुले यांच्या वंशज शांता नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल तरडे, ओव्हाळ ट्रस्ट अध्यक्ष अनिता ओव्हाळ, डॉ. मच्छिंद्र ओव्हाळ, दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सातकर, आरपीआय महिला आघाडीच्या शीला गांगुर्डे, ऋषिकेश केदारी, प्रकाश कांबळे, युवा उद्योजक योगेश भानुसे आदींसह सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रमोद गायकवाड हे सामाजिक व राजकिय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. समाजातील वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. पुणे येथील एस.डी.ओव्हाळ ट्रस्ट व किमया आश्रम पुणे आयोजित यावर्षीच्या भीमरत्न गौरव पुरस्कारासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version