| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-रामेश्वर येथील रहिवासी प्रमोद नारायण जोशी यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 6) निधन झाले. निधनसमयी ते 64 वर्षांचे होते. प्रमोद जोशी हे दैनिक कृषीवलचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. कृषीवलमध्ये जवळपास 35 वर्षे त्यांनी मुद्रित शोधक म्हणून काम केले. मागील दोन दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, नातू असा परिवार आहे. जोशी यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कै. जोशी यांचे दशक्रिया विधी कार्य सोमवार, दि. 15 जुलै रोजी, तर उत्तरकार्य गुरुवार, दि. 18 जुलै रोजी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.