चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रणिता म्हात्रे बिनविरोध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रणिता प्रल्हाद म्हात्रे याची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

मावळते उपसरपंच यतीन घरत यांच्या रिक्त जागेवर निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव प्रणिता प्रल्हाद म्हात्रे यांचाच अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे सभेचे अध्यक्ष तथा सरपंच स्वाती पाटील यांनी जाहीर केले.

उपसरपंचपदी प्रणिता म्हात्रे याची बिनविरोध निवड जाहीर होताच शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषद गटनेते अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक परेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, अलिबाग पंचायत समिती उपसभापती मिनल माळी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version