रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर

चिपळूण । प्रतिनिधी ।
विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर यांची तर सेक्रेटरी पदी अविनाश पालशेतकर ,खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर यांची निवड करण्यात आली.

व्यवसायाने सुवर्णकार असलेले प्रसाद सागवेकर हे बीकॉम असून चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. गेले अनेक वर्षे ते विविध क्षेत्रात सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असून गेली अकरा वर्षे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सेक्रेटरी पदी निवड झालेले अविनाश पालशेतकर हे एम कॉम असून डीबीजे महाविद्यालयामध्ये गेली अठरा वर्षे लेक्चरर म्हणून काम करीत आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेले अविनाश पालशेतकर पाच वर्षांपूर्वीपासून रोटरी क्लबमध्ये सक्रिय झाले. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. खजिनदारपदी निवड झालेले डॉ. निनाद नयन साडविलकर हे एमडी (आयुर्वेद) असून आयुर्वेद चिकित्सक व अध्यापक म्हणून गेली दहा वर्षे चिपळूणमध्ये कार्यरत आहेत. शहरातील चिंचनाका येथे त्यांचे आरोग्यवर्धन आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय असून एमईएस आयुर्वेद महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.लोटे येथील असिस्टंट गव्हर्नर पद्माकर सुतार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version