प्रशांत नाईक अलिबागचा ब्रँड -पंडीत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग नगरपरिषद जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असतानाही सातत्याने कमी निधी देण्याचा प्रकार सत्ताधार्‍यांनी केला आहे. तरी देखील शेकापच्या आमदारकीच्या माध्यमातून शहरात जास्तीत जास्त निधी देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शेकापने केले आहे. जिल्ह्यात 15 तालुक्यात एकमेव अलिबाग नगरपालिका सर्वोत्कृष्ट असून प्रशांत नाईक हा अलिबागचा ब्रँड झाला आहे. हे असेच राहिले तर त्यांच्या समोर कोणीच उभे राहण्याची हिम्मत करणार नाही अशा शब्दात शेकाप नेते पंडित पाटील यांनी गौरवोद्गार काढले.
ज्यांच्यावर मतदारांनी विश्‍वास टाकला ते संकटात घरी बसले पण चित्रलेखा पाटील यांनी जीवाची पर्वा न करता जनतेसाठी काम करत शेकापक्ष हा काम करणारा पक्ष आहे हे दाखवून दिले. जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकास कामे करणारी अलिबाग ही एकमेव नगरपालिका आहे. मात्र नगरपालिके मागे आमदार खासदार नसतील तर विकास कसा करणार याची जाणीव ठेवून जनतेनेच पुन्हा माजीचे आजी करावे असे आवाहनही त्यांनी केले. निधी आणण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरल्याचे त्यांनी यावेळी नमुद केेले. मतदारांनी काम करणार्‍यांना पाडले याची खंत व्यक्त करतानाच शेकापचे आमदार कधीच विकासकामात पक्षपात करीत नाहीत म्हणून मते मिळत नसताना देखील जयंत पाटील यांनी आपल्या निधीतून थळमधील रस्त्याचे काम केले. आपला पराभव हा श्रीखंडीने केला असून राजकारणातील श्रीखंडी कोण आहे हे सर्वांना माहित आहे.

Exit mobile version