। उरण । वार्ताहर ।
उरणचे ड्रँशिंग नेत्रुत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.20) निधन झाले आहे. प्रशांत पाटील यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
प्रशांत पाटील यांचा जन्म भेंडखळ या गावात झाला काँलेज जीवनापासून त्यांनी तरुणांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना पक्षात असताना त्यांनी तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख ही पदे भुषवून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने उभारली. प्रशांत पाटील यांनी राजकीय पक्षात असताना आपल्या नावाचा ठसा शासकीय अधिकारी, सर्व सामान्य माणसात उमटवला. त्यातून त्यांना आदराने सर्वसामान्य माणसाने भाऊ ही पदवी बहाल केली होती. नवी मुंबई शहराचे शिल्पकार तथा राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्या प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही. असे लढवय्ये, उरणकरांचे डॅशिग नेतृत्व प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांचे गुरुवारी (दि.20) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने उरणकरांचे हक्काचे डॅशिग नेतृत्व हरपले अशी प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त केली जात आहे.