प्रशांत पाटील यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।

उरणचे डॅशिंग नेतृत्व तथा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांचे गुरुवारी (दि.20) निधन झाले. वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ 18 जूनला पनवेल येथे पदवीधर मतदार आणि कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शनही केले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने प्रशांत यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version