महाड आगारातून प्रतापगड बसच्या विशेष फेर्‍या

| पोलादपूर । वार्ताहर ।
शारदीय नवरात्रौत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्‍या आई भवानीदेवीच्या भक्तांसाठी पोलादपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रसाद इंगवले यांनी महाड एसटी आगाराकडे मागणी केल्यानुसार बसच्या विशेष फेर्‍या सुरू झाल्याची माहिती आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. सोमवारी घटस्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारपासून सुरू होत असलेल्या महाड ते प्रतापगड बसच्या दररोज दोन फेरीचे दसर्‍यापर्यंतचे वेळापत्रक महाड आगाराकडून जाहिर करण्यात आले आहे.

यानुसार पहिली फेरी सकाळी महाडमधुन निघण्याची वेळ सकाळी 7 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ सकाळी साडेसात वाजता, प्रतापगडावरुन निघण्याची वेळ साडेअकरा वाजता, दुसरी फेरी महाडमधून निघण्याची वेळ दुपारी 2 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ दुपारी अडीच वाजता, प्रतापगड वरुन निघण्याची वेळ सायंकाळी साडेपाच वाजता असे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सुरक्षित प्रवासासाठी प्रतापगड दर्शनबससेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे मत प्रसाद इंगवले यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version