प्रतापराव भोसले यांचे निधन

| सातारा | प्रतिनिधी |

राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचे रविवारी (दि. 19) सातारमध्ये निधन झाले. रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होते. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मतक पदे भूषवली. ते काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष होते. प्रतापवराव भोसले यांनी चार वेळा आमदारकी जिंकताना कमी वयामध्ये आमदार होण्याचा मान मिळवला होता.

Exit mobile version