। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली येथिल डी.पी रोडवरील मैदानावर हाय डेफिनिशन मॅनेजमेंटने आयोजित केलेल्या 14 वर्षांखालील मुलांसाठीच्या 25 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी एस.गी.सी.ए नवी मुंबई व प्रतीक क्रिकेट अकादमी पनवेल ह्या दोन संघामध्ये झाला,अंतिम सामना प्रतीक क्रिकेट अकादमी पनवेल संघाने जिंकून चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील दहा संघ सहभाग घेतला होता.साखळी आणि बाद पद्धतीने सामने आयोजित करण्यात आले होते. सुमारे 23 दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्या प्रतीक क्रिकेट अकादमी पनवेल संघाने 7 गडी गमावून 190 धावा केल्या, वरच्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज गौरव चटुफळे याने सुरेख फलंदाजी करत 85 धावा काढल्या.एस.गी.सी.ए कडून नयन गुंडगेने 2 बळी घेतले. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर एस.गी.सी.ए संघाचा डाव फसला. पनवेलचा फिरकी गोलंदाज अथर्व पाटीलने चार बळी घेतले. एसजीसीएचा संपूर्ण डाव 127 धावांवर आटोपला. पनवेलने अंतिम फेरीत 63 धावांनी विजय मिळवला.संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ खेळ करणार्या क्रिश भैरा, अथर्व पाटील, गौरव चतुफळे यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रतीक क्रिकेट अकादमी पनवेलल तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एस.गी.सी.ए नवी मुंबई संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी जयेश पाटील, आकाश केदारी, प्रितम पाटील, संदीप जोशी, शंकर दळवी उपस्थित होते. उमाशंकर सरकार ,ऋषिकेश कर्णुक निकुंज विठलानी यांनी आयोजित केलेली हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.