। गडब । वार्ताहर ।
ऑल स्पोर्टस असोसिएशन फॉर डिसेबल्ड आयोजित, अंपग कल्याणकारी संस्था रायगड, दिव्यांग क्रिडा असोसिएशन नवी मुंबई, कांळबादेवी युवक क्रीडा मंडळ गडब यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरिय दिव्यांग (पॅरा) कबड्डी स्पर्धेत रायगड (ब) संघाने विजेते पद मिळविले.
या स्पर्धेतील अंतिम सामना रायगड (अ) विरुध्द रायगड (ब) याच्यात झाला. सुरुवातीपासूनच रायगड ब संघाने या सामन्यावर आपली पकड ठेवली होती. रायगड ब सघाचा अष्टपैलु खेळांडु सहदेव बरडे, आंतरराष्ट्रीय खेळांडू सचिन तांडेल यांनी आक्रमक खेळ करीत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली. तर रायगड अ संघाचा आंतरराष्ट्रीय खेळांडू राजेश मोकल, मुकुल खांडे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा प्रयन्त केला, परंतु त्याचे प्रयन्त कमी पडले. अखेर हा सामना रायगड ब संघाने जिकुंन राज्य अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळांडु सहदेव बोरडे रायगड (ब) सर्वोत्कृष्ट चढाई राजेश मोकल रायगड (अ ) यांना पारितोषक देण्यात आले.
या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य अपंग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, माजी आ. धैर्यक्षील पाटील, प्रसाद भोईर, आर.एन. म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, अर्पणा कोठेकर, नितिन पाटील, प्रकाश पाटील, अंनत पाटील, मंगेश म्हात्रे आदि मान्यवररांचे हस्ते करण्यात आले.