प्रतिक वाघमारेचे एमपीएससी परीक्षेत यश

। वावोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पेण मधील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर एमपीएससीची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग अ ची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता या पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. या परीक्षेला महाराष्ट्रातील एकूण 21 जण उत्तीर्ण झाले असून प्रतीक वाघमारे हा मागासवर्गीय प्रवर्गातून सहा जिल्ह्यात म्हणजेच कोकण मधून एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. प्रतिकचे आई-वडील हे प्राथमिक शिक्षक आहेत. प्रतिक हा केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा, साहित्य, संगीत क्षेत्रातही तरबेज आहे. प्रतीकला तबला वाजवण्याची आवड असून त्याला गायनाची देखील मोठी आवड आहे. त्याने स्वतः तयार केलेल्या चालीवर गायन करून त्याने त्याचा स्वतःचा म्युजिक अल्बमही बनवला आहे. त्याचा हा अल्बम त्याच्या युट्युब चॅनलवर देखील पाहायला मिळतो. त्याला या क्षेत्रातही उत्तम कामगिरी बद्दल बक्षीस, प्रमाणपत्र मिळाले आहेत.

Exit mobile version