| महाड । प्रतिनिधी ।
महाडमध्ये सुरु असणार्या चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंने मीनाताई ठाकरे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाशिक येथे 21 ते 22 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत, चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी व अंजुमन-ए-इस्लाम-अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात 5332 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे बेंगळूरू येथे होणार्या 61 व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे अकॅडमीचे अध्यक्ष सचिन शिर्के व इतर पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले व खेळाडूला श्री विनायक शिर्के व प्रा. समीर गाडगीळ यांचे विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले आहे. लतीफ लंबाडे यांनी मिळवलेल्या यशाचे महाड पोलादपूर तालुक्यात कौतुक केले जात असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.