प्रतीक पेडणेकर यांचा सत्कार

| आगरदांडा | प्रतिनिधी |

श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक प्रतीक रमेश पेडणेकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याचे औचित्य साधून नांदगाव हायस्कूल येथील शिक्षक शिक्षकेट्टर कर्मचारी वृंद यांच्यावतीने पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापक श्रीधर ओव्हाळ, अर्चना खोत, महेश वाडकर, संतोष बुलू, योगेश पाटील, दत्ता खुलपे, मंगेश नांदगावकर, रवींद भोई, सागर राऊत, योगेश पाटील, राहील घलटे आदीसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version