मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
१९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. तर, दरेकरांना चौकशासाठी बोलावण्यात आल्यानंतर आज पोलीस स्टेशनबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली.

Exit mobile version