| चिरनेर | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील खिडकी पिंपळपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण विश्वनाथ पाटील (62) यांचे सोमवारी (दि.28) मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर खिडकी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी नलिनी पाटील, पुत्र आतिष पाटील, कन्या अंकिता व धनश्री, सुना, जावई, भाऊ, वहिनी पुतण्या व नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवारी (दि.7) श्रीक्षेत्र पेझारी येथे होईल. त्यानंतर खिडकी पिंपळपाडा येथे उत्तरकार्याचा विधी होईल, अशी माहिती पुत्र आतिष पाटील यांनी दिली.






