राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी प्रविण पाटील यांची निवड

| उरण | वार्ताहर |

राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. 2025 या वर्षी रायगड जिल्ह्यातून प्रविण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे.

प्रविण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा 28 वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, जिल्हा शिक्षण व व्यावसायिक विकास संस्था पनवेल रायगड येथे विषय सहाय्यक म्हणून काम केले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात प्रविण पाटील यांनी सहभाग घेतला आहे. देश पातळीवरील गुवाहाटी सिक्कीम या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात सहभाग घेतलेला आहे. रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना राज्यात व राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी समन्वयक म्हणून शिक्षक प्रविण पाटील यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. सामाजिक जीवनात अनेक आदिवासी लोकांना विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात प्रविण पाटील हे मदत करत आहेत. सामाजिक कार्य करण्यात प्रविण पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे.

Exit mobile version