जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन

। ठाणे । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

Exit mobile version