मुरूड शहरात मान्सुनपूर्व कामांना गती

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मान्सुनपूर्व साफसफाईची कामे हाती घेतले असून शहरातील गटार साफसफाईच्या कामाला गती मिळाली आहे. मुरूड शहरासह पंचक्रोशीभागात परिसरात 3500 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पाणी जमा होऊ नये. त्याकरिता मुरूड जंजिरा नगरपरिषद मार्फत दरवर्षी मान्सुनपूर्व साफसफाईच्या माध्यमातून शहरातील सर्व गटारे व गटारावरील वाढलेली झाडे-झुडपे तोडून साफ केली जातात. शहरात जवळपास 35 किलोमीटर गटारे व 5 किलोमीटर मुख्य नाले आहेत. पालिकेकडून एप्रिल व मे महिन्यात गटारांची साफसफाई केली जाते. मुरूड शहर स्वच्छ व सुंदर अशी ओळख आहे. त्यामुळे येथे गटारे व नाल्याची विशेष काळजी घेतली जात आहे. वेळोवेळी गटारे साफ करण्यात येत असल्याने येथे गटारे पावसात तुंबणे, दुर्गंधी होणे या सारख्या समस्या नसतात. साफसफाईचा ठेका व्हि.डी.के.पुणा यांना देण्यात आला असून हे काम साधारण 50 टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. 30 मे पर्यंत गटार सफाईची काम पूर्ण होतील अशी माहिती आरोग्य निरीक्षक राकेश पाटील यांनी दिली. नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन राकेश पाटील यांनी केले.

Exit mobile version