| सुकेळी | वार्ताहर |
रायगड जि.प.तर्फे शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा कानसई येथे दाखल होणार्या मुलांचे औक्षण करत शाळेत दाखल करून घेण्यात आले. मुख्याध्यापक बाळासाहेब चिंचोले यांनी पुढाकार घेऊन शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत या मुलांना प्रभातफेरी कडून त्यांचे औक्षण करून शाळेत दाखल करून घेतले. यावेळी ही मुले नवीन पाहुणे असल्याने त्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात निवास पवार, सुमित काते, दिलीप हारपाल यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर अमित काते यांनी कार्यक्रमात सर्वांना नाश्ता दिला. कार्यक्रमाला स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील हारपाल, महेंद्र ढाणे, अजित ढाणे, अंगणवाडी सेविका मानसी ढाणे, शालिनी हारपाल प्रज्वली, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.