प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा

मँचेस्टर सिटीचा दमदार विजय

। मँचेस्टर । वृत्तसंस्था ।

मँचेस्टर सिटीने दुबळय ल्युटनवर 5-1 असा दमदार विजय मिळवताना इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या जेतेपदासाठीची चुरस कायम राखली आहे. सिटीचे आता 32 सामन्यांत 73 गुण झाले आहेत. त्यांना लिव्हरपूल आणि आर्सेनलकडून आव्हान मिळते आहे. ल्युटनचा बचावपटू दायकी हाशिओकाकडून झालेल्या स्वयंगोलमुळे सिटीला दुसर्‍याच मिनिटाला आघाडी मिळाली. यानंतर ल्युटनने पूर्वार्धात सिटीला केवळ एका गोलवर रोखले होते. मात्र, उत्तरार्धात सिटीने गोलच्या मिळालेल्या संधी सत्कारणी लावताना मोठा विजय मिळवला. त्यांच्यासाठी माटेओ कोवाचिच (64व्या मिनिटाला), अर्लिग हालँड (76व्या मि.), जेरेमी डोकू (87व्या मि.) आणि जोस्को ग्वार्डियोल यांनी गोल केले. ग्वार्डियोलने आपला गोल 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत केला. ल्युटनचा एकमेव गोल रॉस बार्कलीने 81व्या मिनिटाला केला होता.

अन्य लढतीत, न्यूकॅसलने टॉटनहॅमला पराभवाचा धक्का दिला. न्यूकॅसलने हा सामना 4-0 असा मोठय फरकाने जिंकला. न्यूकॅसलसाठी आघाडीपटू अलेक्झांडर इसाकने (30 व 51व्या मि.) दोन, तर अ‍ॅन्थनी गॉर्डन (32व्या मि.) आणि फॅबियन शेर (87व्या मि.) यांनी एकेक गोल केला. मँचेस्टर युनायटेडला बोर्नमथने 2-2 असे बरोबरीत रोखले.

Exit mobile version