जिल्ह्यातील बंदरांत मासेमारीची रेलचेल

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मासेमारीला 1 अऑगस्टपासून सुरुवात होणार असल्यामुळे ट्रॉलर आणि पारंपरिक मच्छिमारांनी 15 दिवस अगोदर नौकांच्या डागडुजीला सुरवात केली. सुतारकाम, मशिनरीची कामे करण्यासाठी लागणारे मेकॅनिक, नौकाना पेंटिंग करणे आदी कामगारवर्ग कामाला लागले होते. वातावरण निवळू लागल्यानंतर आंजर्ले खाडीतून नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. तसेच, अमावस्येनंतर उधाणाचा फायदा घेऊन भरतीच्यावेळी जिल्ह्यातील काही नौका खाडीतून बाहेर पडल्या आहेत. यानंतर सलग दोन दिवस 150 हुन अधिक नौकांनी मासेमारीला आरंभ केला आहे.

बहुसंख्य मच्छीमार गणपती सणानंतर मासेमारीचा मुहूर्त साधणार आहेत; परंतु, मासेमारी चालू होण्याच्यादृष्टीने अवलंबून असलेले डिझेल, बर्फ कारखाने, हार्डवेअर दुकाने, किराणा मालाची दुकाने सर्व उद्योग बर्‍यापैकी चालू आहेत. पंचक्रोशीतील मोठे बर्फ कारखानेही चालू झाले आहेत. हर्णे बंदर मच्छीमारांच्या तयारीने गजबजून गेले आहे.

Exit mobile version