पेणमधील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची तयारी पूर्ण

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची मुदत संपली असून सध्या या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका यावर्षी होणार असून त्याची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती नायब तहसिलदार नितीन परदेशी यांनी दिली. यामध्ये बोरगाव, बेलवडे बुद्रुक, वरवणे, वडखळ, वाशी, दिव, तरणखोप, बळवली, दुष्मी, बोरी, महलमिरा डोंगर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या 11 ही ग्रामपंचायतींची निवडणूक मतदान यादी, प्रभाग रचना निश्चित झाली आहे. बोरगाव प्रभाग 3 सदस्य 9, बेलवडे प्रभाग 3 सदस्य 9, वरवणे प्रभाग 3 सदस्य 9, वडखळ प्रभाग 5 सदस्य 15, वाशी प्रभाग 4 सदस्य 11, दिव प्रभाग 3 सदस्य 9, तरणखोप प्रभाग 4 सदस्य 11, बळवली प्रभाग 3 सदस्य 9, दुष्मी प्रभाग 4 सदस्य 11, बोरी प्रभाग 3 सदस्य 9, महलमिरा डोंगर प्रभाग 3 सदस्य 9 अधिक सरपंच अशी आहे. याबाबत नायब तहसिलदार नितीन परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 11 ग्रामपंचायतीच्या निवडणूका तर 3 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकांची तयारी पूर्ण झाली आहे. फक्त तारीख जाहिर होण्याची बाकी आहे. ती तारीख साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात अथवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडयात जाहिर होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version