महाड | प्रतिनिधी |
निरंकारी संत समागमतर्फे 74व्या वार्षिक निरंकारी संत समागम 27, 28 व 29 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार आहे. समागमसंबंधी सूचना प्राप्त होताच समस्त भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा समागम व्हर्च्युअल रूपात साजरा होत आहे.
संपूर्ण समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवर तसेच साधना टी.व्ही चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे. व्हर्च्युअल समागमाचे थेट प्रक्षेपण करण्याचा मिशनच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. समागमाच्या तिन्ही दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या पावन प्रवचनांद्वारे समस्त मानवमात्राला समागम करणार आहेत.
यावर्षीचा संत समागम पूर्णपणे व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत असला तरी त्याला जीवंत रूप देण्यासाठी मिशनकडून रात्रंदिवस अथक प्रयास केले जात आहेत.