16 जुलै पासून जिल्हा चिटणीस मंडळाचा दौरा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी 16 ते 19 जुलै या दरम्यान सर्व तालुक्यात जिल्हा चिटणीस मंडळाचे पदाधिकारी दौरा आयोजित करण्यात आला आहे. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धेर्यशिल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अॅड निलीमा पाटील, सुरेश खैरे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, अॅड सचिन जोशी, अजय झुंजारराव, अॅड किशोर हजारे, देवेंद्र पाटील यांचा यात समावेश आहे.
शनिवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पोलादपूर व महाड तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांची बैठक पोलादपूर येथील महाबळेश्वर रोडवरील मैत्री हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता माणगाव व तळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा माणगाव बाजार समिती येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील नाना खोत यांचे निवासस्थान येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मुरुड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन बोर्ली मांडला येथील आर.डी.सी.सी बँकेत करण्यात आले आहे. तर दुपारी 1 वाजता रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांची बैठक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहा येथील विश्रामगृहात होईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सुधागड तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक गुजराती हॉल, पाली येथे आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक लोहाना हॉल, खोपोली येथे तर दुपारी 1 वाजता कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक नेरळ येथील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 4 वाजता पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन शेकापक्ष पक्ष कार्यालयात करण्यात आले आहे. तर सायंकाळी 5 वाजता उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक मुळेखंड फाटा येथे पांडुरंग पाटील प्रबोधन सामाजिक शिक्षण संस्थेच्या सभागृहात होईल.
त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यतील कार्यकर्त्यांची बैठक शेतकरी भवन येथे तर दुपारी 4 वाजता पेण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन पेण येथील शेकाप कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांना त्यात्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील यांनी केले आहे.