फार्म हाऊस-रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी; ट्रेकिंग कॅम्पासाठी विकटगड, कोथळीगड
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात यावर्षी येथे असलेले फार्म हाऊस आणि रिसॉर्ट सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची नेहमीप्रमाणे गर्दी होणार हे नक्की आहे.
कर्जत तालुका पर्यटन तालुका बनू लागला होता. त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकून फार्म हाऊस उभे राहिले आहेत. स्थानिक अनेक शेतकरी तरुण यांनी लहान- लहान कॉटेज रिसॉर्ट सुरु केले आहेत. कर्जत तालुका पर्यटन तालुका बनण्यात या देखील शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे. कारण कर्जत तालुक्यात आज तब्बल अडीच हजार रिसॉर्ट हे स्थानिक तरुणांचे आहेत. त्यासर्व रिसॉर्टवर लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी मैदाने आहेत, सर्वांसाठी आवश्यक असलेली स्विमिंग पूल आहेत तर निरव शांतता आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर असे सर्व काही त्या ठिकाणी उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील रिसॉर्ट ही वर्षातील सर्व विकेंडसाठी पर्यटक पाहुण्यांना आकर्षित करणारी केंद्र ठरू लागली आहेत.
पोपटी पार्टी
सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी उभी केलेली रिसॉर्ट आणि कॉटेज हॉटेल्स हिवाळ्यात चर्चेत सतत ती पोपटी पार्ट्यांनी. कर्जत तालुक्यात नोव्हेंबर महिना सुरु झाला कि घाटावरून पावटा वाल विकायला येतो आणि त्या वेळापासून पोपटी पार्ट्या शेतकरी आपल्या रिसॉर्टमध्ये आयोजित करीत असतात. त्या पोपटी पार्ट्यांसाठी आता आगाऊ बुकिंग होऊ लागली असून, आधीच शेतकरी आणि त्यात शेतीची फील मोठ्या प्रमाणात असलेली हॉटेल ग्रामीण भागातील शेवटच्या कोपऱ्यापर्यंत कुठेही उपलब्ध होत असल्याने पर्यटक देखील अगदी आडबाजूला पोपटी पार्ट्यांसाठी जात असतात. पोएटी पार्ट्यांमध्ये केवळ वाल नाहीतर हरभरा यांची देखील पोपटी सगुणा बाग येथे विशेष प्रसिद्ध आहे. सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्रात मोठ्या प्रमाणात वाल आणि हरभरा शेती केली जाते आणि त्या ठिकाणी पोपर्टी पार्ट्या या विशेष आकर्षक आणि लक्षवेधक असतात. या पोपटी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात. शाकाहारी पोपटी पार्ट्यासाठी आयोजक हे वांगे, बटाटे तसेच फ्लॉवर यांचे वापर करतात. तर मांसाहारी पोपटी साठी आयोजक हे बॉयलर चिकन आणि अंडी यांचा वापर करून पर्यटकांना आकर्षित करतात. त्यात नेरळ जवळील तर सर्वच रिसॉर्टमध्ये पोपटी पार्ट्या रंगू लागल्या आहेत.
ट्रेकिंग
कर्जत तालुका पर्यटन तालुका बनण्यात आणखी अनेक विषय महत्वाचे ठरत आहेत. त्यात जंगलात टेन्ट मध्ये जाऊन राहण्याची पर्यटकांची हौस भागविण्यासाठी पर्यटकांचे विशेष आकर्षण राहिले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अशी व्यवस्था करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यात काही रेसोतमध्ये देखील पर्यटकांसाठी टेन्ट उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, तालुक्यात असलेल्या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणांत असे नवीन पर्यटन केंद्र खुले केले जात आहे. रात्रभर डोंगराच्या एका कुशीत किंवा नदी नाल्याच्या परिसरात टेन्ट राहण्याची व्यवस्था अनेक केंद्र करू लागली आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात हिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यात पर्यटकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील असे शेतकरी तरुण पुढाकार घेत असतात. त्यात काही ट्रेकिंग कॅम्प आयोजित करणाऱ्या यंत्रणा कर्जत तालुक्यात कार्यरत असून, त्यांची माहिती नेटवर उपलब्ध असून कर्जत तालुक्यात विकटगड, कोथळीगड, भिवगड अशा किल्यांची भटकंती आयोजित करण्याचा उपक्रम मागील काही वर्षात सुरु झाला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक हे गड किल्ल्यांवर जाण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यामुळे अशा टूर आयोजित करणाऱ्या संस्था आणि ट्रेकिंग कॅम्प कडे नाव नोंदणी सुरु झाली आहे. तर कोंडिवडे आणि वन विहार येथील लेणी देखील रात्रीच्या पर्यटनसाठी विशेष प्रसिद्ध ठरत आहेत. त्या ठिकाणी देखील लेणी पाहण्यासाठी आणि तेथील माहिती देण्यासाठी देखील गाईड उपलब्ध असतात, त्यामुळे त्याठिकाणी देखील पर्यटकांची विशेष गर्दी असते.
माथेरान सजले
हिवाळी म्हटलं कि सर्वांच्या आकर्षणाचे ठिकाण म्हणून माथेरानची स्वतःची ओळख आहे. त्यात माथेरान या पर्यटन स्थळाचे हिवाळ्यातील महत्व म्हणजे तेथील गुलाबी थंडी. माथेरान शिवाय अन्य ठिकाणी असलेली थंडी हि बोचरी असते, मात्र माथेरानमधील 10 अंशहुन खाली पारा आलेला असताना देखील तेथील थंडी जाणवत नाही. त्यामुळे माथेरानच्या थंडीला गुलाबी थंडी समजले जाते आणि थंडीचा अनुभव घेण्यासाठी खास माथेरान ला भेट देणारे हे हजारोने आहेत. माथेरानमध्ये हिवाळ्यात पावसाळ्यासारखी गर्दी पर्यटक करीत असतात. त्यात माथेरानमधील अनेक हॉटेल्स हि प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांना रात्रीच्या वेळी नेवून तेथे कॅम्प फायरचे कार्यक्रम करीत असतात. माथेरानमधील पॅनोरमा पॉईंट येथे जाऊन उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. त्याचवेळी सायंकाळी माथेरान मधील वन ट्री हिल, सनसेट पॉईंट, लुईझा पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची विशेष गर्दी असते.






