। मुंबई । प्रतिनिधी ।
पूर्ण मोसम सुरू होण्याअगोदर मोसमपूर्व सराव शिबिर अतिशय महत्त्वाचे असते. त्यातून शारीरिक तंदुरुस्तीबरबोर मानसिकताही सक्षम करता येते. त्यामुळे या शिबिराकडे गांभिर्याने पाहा, असा सल्ला रणजी विजेता कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईच्या सर्व वयोगटातील खेळाडूंना दिला आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने सोमवारी बीकेसी येथील अकादमीत आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गतमोसमात रणजीसह सात विविध वयोगटात विजेतेपद मिळवलेल्या मुला-मुलींच्या संघांचा गौरव सोहळा होता. त्यात ‘होम ऑफ दी चॅम्पियन्स’ ही नवी थिम यंदाच्या मोसमासाठी तयार करण्यात आली. भारतीय क्रिकेटची पंढरी आणि आता होम ऑफ दी चॅम्पियन्स ही नवी थिम असणार्या मुंबई क्रिकेटचे तीन महिन्यांचे मोसमपूर्व शिबिर सुरू होत आहे. गतवर्षी मिळवलेले 41 वे रणजी विजेतेपद मुंबईचा लौकिक पुढे कायम ठेवण्यासाठी सर्वांसाठी स्फूर्तीदायी ठरणार आहे, असे रहाणे म्हणाला.
मोसमपूर्व सराव शिबीर
