नाटकाचा पहिला प्रयोग सादर
| चिरनेर । वार्ताहर |
तालुक्यातील रांजणपाडा येथील अष्टगंधा कलामंच्याच्या वतीने मरूआईच्या यात्रेनिमित्त मंगळवार (दि.11) पैशाने तुटली नाती या दोन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग बाबीबाई त्रिंबक पाटील हिच्या स्मरणार्थ रांजणपाडा येथील हनुमान मंदिराच्या पटांगणात सादर करण्यात आला. सदर नाटकाचे लेखन हसूराम पाटील यांनी केले असून, दिग्दर्शन धनेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.
नाटकात हसूराम पाटील, वैशाली मोहिते, सुमित कुंभार, रुचिता म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, प्रसाद कडू, रोशन घरत, अशोक पाटील, चेतन पाटील, नवनीत माळी, आनंद कुबल, शेखर केमनाईक यांनी कलाविष्कार सादर केला. अशोक पालेकर यांनी नेपथ्य, राजेंद्र जोशी यांनी प्रकाशयोजना केली. नाट्य प्रयोगाचे उद्घाटन शेकापचे सरपंच काका पाटील, विकास नाईक, रमाकांत म्हात्रे, मुरलीधर ठाकूर, वसंत चिर्लेकर, संतोष ठाकूर, दत्ताराम कोळी, दत्तात्रेय म्हात्रे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सूत्रसंचालन जीवन डाकी यांनी केले.