सुक्या मासळीचे दर वधारले

। कोलाड । वार्ताहर ।

सध्या मे महिना संपत आला असुन मासेमारीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून काही दिवसात मासेमारी बंद करण्यात येईल यामुळे पावसाळ्यात सुकी मासळी मिळत नाही. यामुळे पावसाळ्यात सुकी मासळीची साठवण केली जाते. यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे या मासळीचे दर वाढले आहेत.

पावसाळा सुरु होण्याआधी सुक्या मासळीला राज्यभरातून वाढती मागणी असते. त्यामुळे मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सुक्या मासळीची लगबग पहावाय मिळत आहे. यामध्ये जवळा (सुकट) बोंबील, मांदेली, कोळंबी, बांगडा, अंबाड, मासेसुकट, सोडे यांची मागणी वाढली आहे. काही दिवसावर पावसाळा सुरु होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची साठवण करण्यासाठी सुक्या मासळीची मागणी वाढली असल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. यामध्ये प्रतिकिलो सुकट 200 ते 300, वाकटी 400 ते 500, बोंबील 450ते 500, सोडे 1000 ते 1200 प्रतिकिलो, तसेच इतर सुक्या मासळीचे दर अधिक वाढल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version