उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जेएनपीएत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| उरण | प्रतिनिधी |

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी (दि.4) जेएनपीएत येणार आहेत. पंतप्रधान नवी मुंबईत येणार असल्याने प्रशासनासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या (बीएमसीटी) दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन गुरूवारी (दि.4) दुपारी 12 वाजता होणार आहे. हे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे उपस्थित असणार आहे. जेएनपीएच्या बीएमसीटीच्या गेट नं.16 जवळ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय बंदर आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. नवी मुंबईत पोलिसांकडूनही सर्वत्र तपासणी केली जात आहे. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मोदी हे या कार्यक्रमात काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेएनपीए बंदरातील एका कार्यक्रमासाठी गुरुवारी उपस्थित राहणार असले तरी नवीमुंबई येथील लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा रेंगाळत पडलेला प्रश्न सोडविण्यासाठी अशा स्वरूपाची केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषणा करतात याकडे प्रकल्पग्रस्तांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Exit mobile version