मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ सेवानिवृत्त

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

सहजीवन विद्या मंडळ संचलीत श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीधर रावसाहेब ओव्हाळ हे 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.

यावेळी श्रीधर ओव्हाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, व्यवस्थापन कमिटी व शिक्षक सहकारी यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळेच मी माझा कालावधी पूर्ण करू शकलो.यावेळी त्यांनी जुन्या आठवणी विशद करून शालेय परीक्षाव उपक्रमात यशस्वी वाटचाल केल्याचे सांगितले. इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उत्कृष्ठ लागण्यासाठी शिक्षक वृंदांनी घेतलेली विशेष मेहनत याचा देखील त्यांनी उल्लेख केला. यावेळी सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोजशेठ घलटे, अर्चना खोत, उदय खोत, मंगेश नांदगावकर, योगेश पाटील, संतोष बुल्लू, शांताराम वाघमारे, दीपक गोसावी, मनिषा शिंदे, बंटी करंबत आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version