। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचा मेळावा नढाळ-चौक ता.खालापूर येथे संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआयोजित करण्यात आला होता.
यावेळी पनवेल महानगर पालिकेचे विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य जगदीश पवार,जे.एम.म्हत्रे प्रतिष्ठानचे मुख्यकार्यकारी अधिकारी जे.के.मढवी, निशा पोळेकर, स.रा.मेहेंदळे, बळवंत वालेकर, अ.प्र.देशमुख, अ.पा.म्हात्रे,एस.एम.ठाकूर, बी.पी.म्हात्रे, एस्.एम.पाटील, चंद्रकांत नवगिरे, उल्हास ठाकूर, जगन्नाथ जांभळे, आर.एन.पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी केले. म्हात्रे म्हणाले की सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी भविष्यात आपल्या आरोग्याची काळजी घेत आपले पुढील आयुष्य चिंतामुक्त आनंदी वातावरणात व्यतीत करावे. उपस्थित असलेल्या जवळपास साठ सदस्यांनी स्वरचित कविता वाचन व गायन तसेच कथाकथन केले.