आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील यांच्याकडून निधी
| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे येथे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील आणि कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या स्थानिक विकास निधीमधून ठाणे जिल्ह्यातील 910 अनुदानित शाळांना 2.5 कोटींचे प्रिंटर वाटप करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील आणि आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रिंटरचे वितरण केले. शाळेतील कामाला गती यावी व कामे वेळेवर व्हावीत, या हेतूने प्रिंटर्सचे वाटप करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील एकूण 910 शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले. आमदारांच्या स्थानिक विकास निधी 2022 यामधून ठाण्यातील शाळांसाठी 190 प्रिंटर्स, तर कल्याण डोंबिवली येथील शाळांकरिता 222 प्रिंटर्सचे वाटप केले. तसेच उल्हासनगर तालुक्यासाठी 80, अंबरनाथ 85, भिवंडी 105, नवी मुंबई 196, मुरबाड 36, शहापूर 63 आणि मीरा-भाईंदरकरिता 33 प्रिंटर्सचे वितरण करण्यात आले.