कोरोना काळात रुग्णसेवा करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना अग्रहक्क द्या

आ. जयंत पाटील यांची विधीमंडळात मागणी
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाकाळात जे कर्मचारी तात्पुरते घेतले. त्यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णाचीं चांगली सेवा केली. त्यापैकी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 90 टक्के मुले आणि मुली पदवीधारक आहेत. वाईट याचे वाटते की पदवीधारक मुले असूनही काहीही काम करत होते. असेही काही लोकं समाजात आहेत. या कोरोना काळात काम करणार्‍या कंत्राटी मुलांना आरोग्य सेवेत अग्रहक्काने घेतले पाहिजे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधीमंडळात केली.
यापूर्वी देखील आ. जयंत पाटील यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी कोव्हीड 19 मध्ये जिवावर उदार होऊन काम केले आहे. तसेच अजून कोरोनाचे रुग्ण कमी झालेले नसल्याने सदर कर्मचार्यांना पुन्हा कायमस्वरुपी नियमित करण्याची तसेच सेवा भरतीत प्राधान्य देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. आज हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी हा प्रश्‍न विधानपरिषदेत उपस्थित केला.
31 ऑगस्ट 2021 पासून सदर कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हवालदिल झालेल्या कर्मचार्यांनी सेवेत कायम करून घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एप्रिल हजारो अधिकारी कर्मचार्यांना नियुक्त केले होते. मात्र, आता करोनासंकट कमी झाल्याने डॉक्टर वगळता इतर कर्मचार्यांना कार्यमुक्त केले जात आहे. रिक्त पदे असल्याने आम्हाला पुन्हा सेवेत घ्या, या मागणीसाठी कोव्हिड केंद्रांवर काम करणार्या कर्मचार्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. त्यासंदर्भात आ. जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

Exit mobile version