। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलची कन्या आकांक्षा निटुरे हिने चेन्नई येथे झालेल्या टेनिस हब एमपीटीए नॅशनल ज्युनिअर अंडर 18 क्ले कोर्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि दुहेरी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, प्रितम जनार्दन म्हात्रे ह्यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आणि शेकापच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन केले. आकांक्षाचे वडील दिलीपकुमार निटुरे आणि आई दीपा निटुरे ह्यांचे देखील अभिनंदन केले. आकांक्षा वडिलांनी सांगितले रोज ती बारा तास प्रॅक्टिस करते.
लहानपणापासून आम्ही तिच्यामध्ये टेनिसची आवड पाहिली आणि आम्ही ठरविले की मुलीला शिक्षणापेक्षा क्रीडा क्षेत्रात जास्त आवड आहे तर तिच्या आवडीच्या विषयात मध्येच आम्ही तिला प्राधान्य दिले आणि आज तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर यापुढे होणार्या ऑलिंपिक साठी भारतातर्फे जाण्याची तयारी केलेली आहे. तिला आज पर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये एकूण 77 ट्रॉफी मिळाल्या आहेत.
आज आकांक्षा ज्या पद्धतीने खेळत आहे तिची मेहनत पाहता ती नक्कीच ऑलिम्पिकमध्ये यश मिळवून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करेल अशा शुभेच्छा श्री.प्रितम म्हात्रे यांनी दिल्या.मोठ्या स्पर्धेकरिता लागेल ती मदत देखील मिळवून देण्याचे आश्वासन प्रितम म्हात्रे ह्यांनी आकांक्षाच्या कुटुंबियांना ह्यावेळी दिले.यावेळी आकांक्षाला शुभेच्छा द्यायला मंदार पाटील, सुजित गुळवे, दर्शन कर्डीले, मंगेश अपराज, अविनाश मकास, प्रदीप शेलार, आशिष पाटील, संदेश मोहन उपस्थित होते.