समाजोयोगी उपक्रमांचे आयोजन
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 14 जानेवारीला शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या पुढाकाराने व्ही. के. हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी आठ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड-2, आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ सेक्टर 8/9/10 रहिवाशी संघटना / आम्ही कोकणकर संघटनेच्या माध्यमातून 14 जानेवारी रोजी कोपर तलाव, सेक्टर -8 उलवे येथे मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन, ओपन जिमचे भुमिपूजन, बस थांबा व वाचनालय उद्घाटन अशाप्रकारे विविध समाजोयोगी कार्यक्रमाचे सकाळी 10:00 ते 2:00 या वेळेत नियोजन करण्यात आले आहे. सोमवार 15 जानेवारीला रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जे एम म्हात्रे यार्ड, शिवमंदिर (पळस्पे) शेजारी, जयवंत हॉटेल समोर,पळस्पे फाटा,पनवेल येथे सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत करण्यात आले आहे. सोमवार (दि. 15) सायंकाळी 5.00 वाजता मोफत आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष – खांदा कॉलनी यांच्यातर्फे देवी आंबा माता मंदिर, सेक्टर 13, खांदा कॉलनी येथे करण्यात आले आहे. (दि.16) सायंकाळी 6:00 वाजता व्ही. के. हायस्कूल येथे जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नववर्ष सुगंध संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.