। उरण । प्रतिनिधी ।
धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या शिट्टीचा आवाज जोरदार घुमणार आणि प्रचंड मतांनी निवडून येतील, असे जेष्ठ कार्यकर्ते तसेच तरुण वर्ग सांगत आहे.
दरम्यान, प्रीतम म्हात्रे यांचा प्रचार दौरा, रॅली व सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. तसेच, उरण मतदार संघातील दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील, असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.