प्रियांकां गांधींचा मोदींवर हल्लाबोल

ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होत असतांना ते गप्प असतात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात. मात्र, ऑलिम्पिक खेळाडूंवर लैंगिक छळाच्या घटना घडत असताना ते गप्प राहिले. आता मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला आहे. त्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे. कर्नाटकातील हसनचे खासदार आणि जेडी(एस)चे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला केला.

जिल्ह्यातील सेदाम येथे काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना प्रियांका यांनी, प्रज्वल रेवन्नाला परदेशात पळून जाण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. प्रज्वल रेवन्ना आता देश सोडून पळून गेला असला तरी मोदींना त्याची माहिती नाही. त्यामुळे आरोपी भारतात परत येईपर्यंत महिलांनी याबाबत मोदींना प्रश्‍न विचारावेत, असे त्यांनी प्रियंका यांनी म्हटले. पंतप्रधानांनी नेहमीच शेतकर्‍यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात ते अपयशी ठरले आहेत. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. लोकशाही कमकुवत करून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. पण, काँग्रेस शेतमालाला जीएसटीमुक्त करण्याबरोबरच भूमीहीन मजुरांना जमीन देईल, असे प्रियांका म्हणाल्या.

Exit mobile version