| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात 4 लाख 10 हजार मतांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला. त्यानंतर त्यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबरला झालेल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात 64.24 टक्के मतदान झाले होते. 2009 च्या पहिल्या मतदानानंतर यंदा सर्वांत कमी मतदान या मतदारसंघात झाले आहे. प्रियांका गांधी यांच्याविरोधात लोकतांत्रिक मोर्चाचे उमेदवार सत्यन मोकेरी आणि राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी (छऊ-)चे उमेदवार नव्या हरिदास यांच्यासह 13 उमेदवार रिंगणात होते.