प्रियंका,राहूल पिडीतांना भेटणार

। लखनौ । वृत्तसंस्था ।
उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेऱी भागात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह राहुल गांधी, सीतापूर इथं बंदिस्त असलेल्या काँग्रेस नेत्यांना लखीमपूर खेरी इथं भेट देण्याची परवानगी आता देण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. या सर्वांना घटनास्थळी जाण्यापासून तसंच पीडितांच्या परिवाराला भेटण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यांना अटक करुन सीतापूर विश्रामगृहात बंदिस्तही करण्यात आलं होतं.

Exit mobile version