एज्युकेशन सोसायटीचा पारितोषिक वितरण समारंभ

| खरोशी | वार्ताहर |

पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 24 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी बोलताना अँड मंगेश नेने म्हणाले की आगामी काही वर्षात विद्यार्थ्यांचे हित पाहता व नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांना लॉ कॉलेज व मेडीकल इंजिनिअर यासारखे कॉलेज नव्याने सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितींना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड मंगेश नेने तर प्रमुख पाहूणे संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड बापूसाहेब नेने होते. यावेळी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले कार्याध्यक्ष प्रशांत ओक उपकार्याध्यक्ष संजय कडू, सेक्रेटरी सुधीर जोशी सदस्या डॉ. नीता कदम, आश्विनी शहा, हेमंत वडके, कलावती पाटील, विद्या घरत, लेखा ठाकूर, सुषमा साखरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका लेखा ठाकूर यांनी केले तर सुत्रसंचलन रूचा परांजपे यांनी तर आभार सारा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version