| रोहा | प्रतिनिधी |
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भुवनेश्वर जि.प.गट तसेच धाटाव व भुवनेश्वर पं.समिती गण अंतर्गत किल्ले बांधणी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (दि.15) पार पाडण्यात आला.
किल्ले ही महाराष्ट्राची संपत्ती आहे.ती आपण जपली पाहिजे हा मुख्य हेतू लक्षात घेऊन या स्पर्धेच आयोजन केल होतं. या स्पर्धेत एकूण 24 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेला सकारात्मक पाठिंबा मिळाला. प्रथम क्रमांक 3 हजार रुपये, अभी चाळके ग्रुप मालसई (राजगड), द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये, तेजस मोरे ग्रुप तळाघर (रायगड), तृतीय क्रमांक 1 हजार रुपये, सोनगाव कट्टा, सोनगाव (लोहगड), व चतुर्थ क्रमांक 1 हजार रुपये मावळा ग्रुप भुवनेश्वर (पद्मदुर्ग) तसेच सहभागी स्पर्धेकांना सन्मानचिन्ह व प्रशास्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
किल्ल्यांचे परीक्षण राम महाडिक, विक्रांत बाकाडे, शरद कदम, महेश तुपकर, चेतन मालुसरे व शंतनू रटाटे यांनी केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन महेश बामुगडे यांनी केले. अमित मोहिते, महेश तूपकर, मयूर मोंडे यांनी स्पर्धेकांना मार्गदर्शन व पुढील वर्षी अजून आकर्षक किल्ले बांधून आपली परंपरा जपू या, असे आवाहन केले. तसेच आभार प्रदर्शन शंतनू रटाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पुढील वर्षी अजून मेहनत घेऊन नावीन्य आणू, असे महेश बामुगडे यांनी आश्वासन दिले.






