वाघ्रण ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळाचा पुढाकार
। वाघ्रण । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रण आणि ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी 2025 रांगोळी आणि किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (दि.26) पार पडला.
रांगोळीमध्ये प्रथम प्राजक्ता म्हात्रे यांना पंच रविंद्र पाटील, द्वितीय क्रमांक सुवर्णा पाटील यांना बळवंत गावंड, तर तृतीय रसिका पाटील व खुशी पाटील यांना बाळकृष्ण पाटील व अक्षदा म्हात्रे यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. तर किले स्पर्धेत प्रथम क्रमांक कृतार्थ पाटील यांस सरपंच राजेंद्र पाटील यांनी तर द्वितीय क्रमांक रुद्र पाटील यांस डॉ. कृष्णकांत पाटील आणि तृतीय मित पाटील यांस पंच प्रफुल्ल पाटील यांनी सन्मानित केले. त्याचप्रमाणे खारपेढांबे गावांतील रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक जास्मीन पाटील तर द्वितीय रुत्वी पाटील यांना देखील बक्षिसे वाटप करण्यात आली. तर रांगोळी उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे विभक्ती पाटील, प्रियांका पालील व स्वरा पाटील तर विशेष उत्तेजनार्थ भक्ती पाटील व हर्षा पाटील यांना देण्यात आली.







